शिक्षण क्षेत्र आणि आरक्षण
आरक्षण हा विषय थोडा नाजूक आहे. बऱ्याच जणांचा त्याला विरोध आहे आणि त्या बद्दल मी त्यांच्या मतांचा आदर करतो. जसं मला मत आहे, तसं ते इतरांना देखील आहेचं की. त्या मुळे सर्वांनी माझ्या म्हणण्यानुसार चं करायला हव, असा काही आग्रह नाही. पटल तर बघा, नाही तर सोडून द्या. पण वादावादीच्या फंदात पडू नका. कारण वेळ आधीच कमी आणि वादावादीतून काही साध्य होईल अस ही नाही. आधीच आपली कल्पना दिलेली बरी.
या आधीच मी आरक्षण हव हे मत मांडलेल असताना, त्यात काही खुलासा करावा अस वाटलं म्हणून हा खटाटोप. माझ्या मते काही विशेष क्षेत्रात आरक्षण हे नसाव. उदाहरणार्थ शिक्षण, आरोग्य, इत्यादी. गुणवत्तेच्या आधारेच अशा महत्वाच्या क्षेत्रात नोकरी द्यावी. अन्यथा आपण आपल्या आणि येणाऱ्या भावी पिढीच्या पायावर कुऱ्हाड मारल्या सारख होईल. ब्राम्हण आणि इतर पुढारलेल्या मंडळीनी मागासवर्गीयांना कमी नं लेखता, त्यांना मानाची वागणूक द्यावी अन त्यांना देखील प्रगती करता यावी यासाठी मदत करावी. आरक्षण हे कायम स्वरूपी नसून, ते एक कालमर्यादेसाठी असावे. अन्यथा ती एक गंभीर समस्या बनेल. गेल्या काही महिन्यात बरेच राज्यात जे बंद झाले ते बघून खूप चिंता वाटते. मागासवर्गीय म्हणून आपल्या जातीला मान्यता मिळावी या साठीचे हे बंद होते. अशी जर मानसिकता असेल तर खूप कठीण आहे. मला सगळेचं राजकीय पक्ष सारखे आहेत. पण जर स्वातंत्र मिळाल्याच्या ६४ वर्षानंतर देखील जर असे बंद होत असतील, तर भारतामध्ये नक्की विकास कोणाचा झाला हा प्रश्न आहे.